
पाटणा : ‘‘बिहारमध्ये मतांची चोरी करण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी केली असून भाजपच्या नेत्यांना दोन दोन मतदान ओळखपत्र देण्यासाठी आयोग मदत करत आहे,’’ असा खळबळजनक दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला. दरम्यान, भाजपने तेजस्वी यादव यांचे आरोप नाकारले. यादव यांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.