बिहार रणसंग्राम : आई-वडिलांना विचारा, शाळा कोठे बांधली?

पीटीआय
Sunday, 25 October 2020

तुम्हाला (तेजस्वी) जर आज शिकायचे असेल तर आपल्या वडिलांना (लालू प्रसाद) विचारा, आईला (राबडी देवी) विचारा, की शाळा कोठे बांधली होती का? राज्यात एक तरी महाविद्यालय उभारले का, जरा विचारुन पाहा. सत्ता करण्याची संधी मिळाली तर ओढतच राहिले. आता आतमध्ये गेले तर पत्नीला गादीवर बसवले, अशी टीका आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या भाषणशैलीचे बिहारवासीय चाहते आहेत आणि विरोधक देखील. मात्र प्रचारसभेत राजदचा उल्लेख होतो, तेव्हा त्यांच्यावर टीका करताना नितीशकुमार यांची भाषा घसरलेली दिसून येते. आज बेगुसराय जिल्ह्यातील तेघडा मतदारसंघात भाषणादरम्यान नितीशकुमार यांनी राजदच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना म्हटले, की जेव्हा लोकांना संधी मिळाली तर काय केले. त्यांनी एकच शाळा बांधली होती?ं राजदच्या राजवटीत गुन्हेगारी, लूटमार आणि अपहरणाने उच्चांक गाठला. परंतु आता विकासाची कास धरली आहे, असे ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tejashwi yadav comment on Nitishkumar politics