हाजीपूर : बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे काल रात्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. हाजीपूर-मुजफ्फरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २२ वरील (Hajipur-Muzaffarpur National Highway) गोरौल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोधिया पुलाजवळ एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या ताफ्यातील वाहनांना जोराची धडक दिली.