
नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या फेरतपासणीवरून आगामी विधानसभेवर बहिष्कार घालण्याचा पर्याय आमच्याकडे खुला आहे, असा दावा बिहारमधील विरोधीपक्ष नेते व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.