Tejashwi Yadav : जागावाटपाबाबत खलबते सुरू; ‘आरजेडी’च्या तेजस्वी यादव यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट
Bihar Politics : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर काँग्रेस व आरजेडीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. तेजस्वी यादव यांनी खर्गे व राहुल गांधी यांची भेट घेऊन रणनीतीबाबत चर्चा केली.
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या सूत्राबाबत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी)नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांच्याशी खलबते केली.