
पाटणा : बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास राज्यातील महिलांना दरमहिन्याला अडीच हजार रुपये देण्याचे आश्वासन लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने दिले आहे. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिरात दिली आहे.