
पाटणा : आगामी जनगणनेमध्ये जातिनिहाय गणना करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सामाजिक सुरक्षा आणि आरक्षण धोरणांचा सर्वंकष फेरआढावा घेण्यात यावा, असे मत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मांडले. यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून वरील आवाहन केले आहे.