
Tejashwi Yadav : तेजस्वी यांनी दिल्लीतील १५० कोटींचा बंगला ४ लाखात घेतला; ईडीचा दावा
नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या कुटुंबावर टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रोकड आणि 600 कोटी रुपयांची इतर मालमत्ता उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात, ईडीने तेजस्वींचा 150 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा बंगला देखील शोधून काढल्यांच म्हटलं आहे, जो केवळ 4 लाख रुपयांना विकत घेतल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या न्यू फ्रेंड कॉलनीमध्ये असलेला चार मजली बंगला अवघ्या ४ लाख रुपयांना विकत घेतल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. शुक्रवारी या बंगल्यावर छापा टाकला तेव्हा बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपस्थित होते.
इतकेच नाही तर अंमलबजावणी संचालनालयाने लालू यादव यांची मुलगी आणि तेजस्वी यादव यांची बहीण रागिणी यादव यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त केली. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, रागिणी यादवच्या घरातून ५४ लाख रुपये रोख आणि करोडो रुपयांचे दीड किलो दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ईडीने शुक्रवारी (१० मार्च २०२३) टाकलेल्या २४ ठिकाणी तेजस्वींचा न्यू फ्रेंड कॉलनीतील बंगला आणि त्यांची बहीण रागिणी यादव यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. छाप्यात ईडीला केवळ रोख रक्कम आणि दागिनेच नसून गोपनीय कागदपत्रे मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे.