चार वर्षांपूर्वी बॉर्डर पार करुन पाकिस्तानात; युवकाची झाली घरवापसी

चार वर्षांपूर्वी बॉर्डर पार करुन पाकिस्तानात; युवकाची झाली घरवापसी

नवी दिल्ली: चार वर्षांपूर्वी चुकून बॉर्डर पार करुन पाकिस्तानात पोहोचलेल्या युवकाला आता परत भारतात पाठवण्यात आलं आहे. हा तरुण तेलंगणातील माधापूर भागातून बेपत्ता होऊन 2017 मध्ये पाकिस्तानात पोहोचला होता. त्यावेळी त्या व्यक्तीला बॉर्डर पार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, आता चार वर्षानंतर पाकिस्तानने त्या तरुणाला परत पाठवलं आहे. मंगळवारी सायबराबाद पोलिसांनी या संदर्भातील बातमी दिली आहे. प्रशांत असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रशांत हैदराबादचा रहिवासी आहे आणि तो 11 एप्रिल 2017 रोजी बेपत्ता झाला होता. पोलिसांनी माहिती दिली आहे की प्रशांतच्या कुटुंबियांनी 29 मे 2017 रोजी माधापूर पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या बेपत्ता होण्याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी प्रशांतला शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र नंतर कळलं की त्याला पाकिस्तानमध्ये अटक केली गेली आहे. (Telangana A man detained in Pakistan crossed the border illegally handed over to Indian authorities by Pakistan on May 31)

चार वर्षांपूर्वी बॉर्डर पार करुन पाकिस्तानात; युवकाची झाली घरवापसी
मोठा निर्णय! परदेशातील लशींच्या वापराचा मार्ग मोकळा
चार वर्षांपूर्वी बॉर्डर पार करुन पाकिस्तानात; युवकाची झाली घरवापसी
एकनाथ खडसे यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

पोलिसांनी सांगितलं की, तेलंगणा सरकार, गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या सातत्यापूर्ण प्रयत्नांनंतर प्रशांतची सुटका झाली आहे आणि त्याला 31 मे 2021 रोजी भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. प्रशांतच्या कुटुंबियांनी तेलंगणा सरकार, भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. प्रशांत एक आयटी इंजिनिअर आहे. खाजगी कारणांसाठी तो स्वित्झर्लंडला जाऊ इच्छित होता. मात्र जास्त पैसे नसल्याकारणाने त्याने पायीच स्वित्झर्लंडला जायचं ठरवलं. 11 एप्रिल 2017 रोजी तो घरातून निघाला आणि ट्रेनमधून तो बिकानेरला पोहोचला. तिथून प्रशांत भारत-पाकिस्तानची बॉर्डर पार करुन गेला. पाकिस्तानमध्ये खूप आत गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रशांतला पकडलं आणि त्याच्यावर अवैध प्रवेशाचा गुन्हा दाखल केला. तिथली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आता प्रशांतला सोडण्यात आलं आहे. अटारी सीमेवरील अधिकाऱ्यांकडे प्रशांतला सोपवण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com