rishi sunak
rishi sunak esakal

सूनक ब्रिटनचे PM बनल्यानंतर भाजप नेत्याची पक्षावर आगपाखड; लिहिला दोन पानी राजीनामा

सूनक ब्रिटनचे PM बनल्यानंतर भाजप नेत्याची पक्षावर आगपाखड; लिहिला दोन पानी राजीनामा
Published on

नवी दिल्ली : ऋषी सूनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्यानंतर त्याचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. तेलंगणातील भाजपचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार आनंद भास्कर रापोलू यांनी पक्षाध्यक्षांकडे दोन पानी पत्र लिहित प्राथमिक सदत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाची ओळख भयानक आणि फुटिरतावादी पक्ष अशी झाल्याचा गंभीर आरोपही केला. त्याला सूनक यांचा संदर्भही त्यांनी जोडला आहे. (Telangana BJP leader slams party in two pages resignation letter over UK PM Rishi Sunak)

रापोलू यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं की, आपल्या वसुधैव कुटुंबकम या तत्वाशी भाजप एकनिष्ठ आहे का? यासाठी त्यांनी ब्रिटनचं उदाहरण दिलं आहे. ब्रिटननं तीन टक्के भारतीय वंशाच्या व्यक्तींपैकी एकाला पंतप्रधानपदी बसवलं आहे. अमेरिकेकडं तर आधीच भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. हे देश कशाप्रकारे दुर्लक्षित असलेल्या घटकालाही प्रोत्साहन देत आहेत.

rishi sunak
Telangana : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं दिला पक्षाचा राजीनामा

सर्व पक्षांचे आणि भाजपचे लाडके नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजधर्माची आठवण करुन दिली होती. पण भाजप त्यांच्या या सूचनांचं कधी पालन केलं का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच भाजपची ओळख एक भयानक आणि फुटिरतावादी पक्ष बनल्याचा आरोपही त्यांनी आपल्या दोन पानी राजीनाम्यातून केला आहे.

rishi sunak
Cyclone Sitrang: महाराष्ट्रातही 'सीतरंग' थैमान घालणार? हवामान विभागाने दिली माहिती

आनंद रापोलू यांनी सन २०१९ मध्ये भाजपत प्रवेश केला होता. गेल्या चार वर्षापांसून पक्षानं आपल्याकडं दुर्लक्ष केल्याचा, अपमानित केल्याचा तसेच राष्ट्रीय राजकारणातून बाहेर ठेवल्याचा आरोप केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com