chevella Accident
sakal
देश
Telanga Tragedy: लेकींना बोलवू नको म्हणलेले बाबा, आईने लपवून आणलं; पण अपघातात ३ बहिणींचा मृत्यू
chevella Accident: तेलंगणात काळाने घाला घातला! एकाच कुटुंबातील तीन मुलींसह १९ जणांचा भीषण अपघातात मृत्यू. तीनही मुली गमावलेल्या वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश “मी सांगितलं होतं, मुलींना बोलावू नकोस…”
तेलंगणा: खडीने भरलेल्या टिप्पर आणि खाजगी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. हा दुर्दैवी प्रकार सोमवारी सकाळी सुमारे सात वाजता, हैदराबादपासून अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर घडला. अपघात इतका जबरदस्त होता की बसमधील अनेक प्रवाशांना जागीच प्राण गमवावे लागले, तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे.

