चंद्रशेखर राव यांच्या भाजप विरोधातील लढ्याचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक

'केसीआरजी, तुमची लढण्याची शक्ती प्रचंड आहे. तुम्ही देशाचे विभाजनकारी शक्तींविरोधात आवाज उठवला आहे.'
Chadrasekhar Rao And Uddhav Thackeray
Chadrasekhar Rao And Uddhav Thackerayesakal

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर (Chandrasekhar Rao) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २० फेब्रूवारी रोजी मुंबईत भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले आहे. चंद्रशेखर यांनी भाजप विरोधात पुकारलेल्या लढ्याचे फोन करुन ठाकरे यांनी कौतुक केले व त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी चंद्रशेखर यांना २० फेब्रुवारीला मुंबईत भेटीचे निमंत्रण दिले आहे. या प्रसंगी भाजपविरोधातील भविष्यातील नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. केसीआरजी, तुमची लढण्याची शक्ती प्रचंड आहे. तुम्ही देशाचे विभाजनकारी शक्तींविरोधात आवाज उठवला आहे. तुम्ही योग्य वेळी लढ्याला सुरुवात केली आहे. यातून राज्यांचे अधिकारांबरोबरच देशाचे संरक्षण होईल. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय आणि तसेच लोकांमधून समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न करु, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केसीआर यांना पाठिंबा दिला.(Telangana CM K Chandrasekhar Rao Will Meet Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray)

Chadrasekhar Rao And Uddhav Thackeray
बाबांचा जप कोरोना पळविण्यासाठी का! प्रशांत भूषण यांची मोदींवर टीका

सध्या वेगवेगळी राज्ये आणि केंद्र सरकार यामध्ये तणावाचे संबंध पाहायला मिळत आहे. विशेषतः बिगर भाजप (BJP) राज्य सरकारांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारविरुद्ध लढाई सुरु केली आहे.

Chadrasekhar Rao And Uddhav Thackeray
Pakistan|अफगाणिस्तानमुळे पाकिस्तान हैरान, संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागितली मदत

राज्यसूचीत असलेल्या विषयांवर केंद्र सरकार अतिक्रमण करताना दिसत आहे. मग कोरोनाची लस, जीएसटी कर किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा बिगर भाजप सरकारांविरोधात वापर या गोष्टी सर्रास पाहायला मिळत आहेत. या स्थितीत दोन राज्यांचे मुख्यमंत्री भेट असतील त्याला विशेष महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com