काँग्रेस नेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

काँग्रेस नेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान म्हणाले...

तेलंगणा : तेलंगणातील काँग्रेसचे नेते राशिद खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP), पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. 'भारताला हिंदु राष्ट्र' बनवण्याचे त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे म्हणत राशिद खान यांनी मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

“मी जिवंत असेपर्यंत भारताला हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ, RSS, VHP आणि बजरंग दल भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाहीत. दरम्यान, रशीद खान यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, राशिद खान सारख्या लोकांनी आम्हाला हिंदु राष्ट्राच्या स्वप्नासाठी काम करण्याची प्रेरणा दिली आहे. राशीद खान यांनी यापूर्वी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आणि हिंदू धर्म स्वीकारलेल्या वसीम रिझवी म्हणजेच आताचे जितेंद्र नारायण त्यागींना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Web Title: Telangana Congress Leader Rashid Khan Once Again Made Controversial Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..