esakal | भाजप उमेदवाराच्या नातेवाईकाकडे सापडली तब्बल 2.3 कोटींची रोकड
sakal

बोलून बातमी शोधा

cash main.jpg

एका वाहनातून रोकड नेली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

भाजप उमेदवाराच्या नातेवाईकाकडे सापडली तब्बल 2.3 कोटींची रोकड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद- अवैधरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोकड नेत असलेल्या एका टोळीचा हैदराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तेलंगणा येथील दुब्बक विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार एम रघुनंदन राव यांच्या नातेवाईकाची ही रोकड असल्याचे सांगण्यात येते. तब्बल 2.3 कोटींची ही बेहिशेबी रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. 

एका वाहनातून रोकड नेली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बेगमपेठ परिसरात या वाहनाला पकडले. हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी नेले जात असल्याची माहिती मिळाली होती, असे हैदराबाद पोलिस आयुक्त अंजनी कुमार यांनी माध्यमांना सांगितले. 

हेही वाचा- US Election 2020: ट्रम्प पराभवाच्या दिशेने ? सर्वेक्षणात बायडेन यांना आघाडी

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक सुरभी श्रीनिवास राव या भाजप उमेदवार रघुनंदन यांचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी 3 नोव्हेंबर रोजी दुब्बक विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी ही रक्कम जप्त केली आह. 

पोलिस आयुक्त कुमार म्हणाले की, तपासात सुरभी श्रीनिवास राव हे ही रक्कम मतदारांना वाटण्याच्या हेतूने नेत असल्याचे स्पष्ट झाले. एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाने ही रक्कम दिली होती. या कंपनीचे मालक माजी खासदार तथा भाजप नेते जी विवेक व्यंकटस्वामी हे आहेत. 

हेही वाचा- 'बाबा का ढाबा' फेमस करणाऱ्या यू-ट्यूबर विरोधातच बाबांची पोलिसांत तक्रार; जाणून घ्या कारण

यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी रघुनंदन राव यांच्या एका नातेवाईकाच्या घरातून 12.8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. 

loading image