esakal | तेलंगणात फटाके उडवण्यास बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

तेलंगणात फटाके उडवण्यास बंदी

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तेलंगण सरकारने राज्यात फटाके विक्री आणि उडवण्यावर बंदी घातली आहे. काल उच्च न्यायालयाने फटाक्याची विक्री आणि वापर करण्यावर तातडीने बंदी घालावी असे आदेश दिले होते.

तेलंगणात फटाके उडवण्यास बंदी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तेलंगण सरकारने राज्यात फटाके विक्री आणि उडवण्यावर बंदी घातली आहे. काल उच्च न्यायालयाने फटाक्याची विक्री आणि वापर करण्यावर तातडीने बंदी घालावी असे आदेश दिले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांनी टीआरएस सरकारवर टीका केली. फटाक्यावर बंदी घालून टीआरएस सरकारने हिंदूंच्या भावनांचा मान राखला नाही, असे कुमार यांनी आरोप केला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image