महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही वाद; KCR यांनी चॉपर दिलं नसल्याची राज्यपालांची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KCR and Tamilisai Soundararajan

महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही वाद; KCR यांनी चॉपर दिलं नसल्याची राज्यपालांची तक्रार

हैद्राबाद - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने प्रवासासाठी हेलिकॉप्टर नाकारले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता असाच काहीसा वाद तेलंगणातून समोर आला आहे. तेलंगणाच्या के. चंद्रशेखर राव सरकारने महिला असल्यामुळे आपल्याशी भेदभाव केला. तसेच प्रवासासाठी चॉपर दिलं नसल्याचा आरोप लावला आहे. (Telangana governor accuses kcr news in Marathi)

हेही वाचा: 'भारत जोडो’ यात्रेनंतर मित्रपक्ष, विरोधक आम्हाला हलक्यात घेऊ शकणार नाही : काँग्रेस

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी अनेक प्रसंगांचा संदर्भ देत राज्य सरकारवर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. महिला असल्यामुळे सरकार भेदभाव करत असल्याचा आरोपही तमिलिसाई यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारकडून प्रवासासाठी हेलिकॉप्टर न मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे अभिभाषण आणि ध्वजारोहण यापासूनही त्यांना वंचित ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

राज्यपालपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर एका कार्यक्रमात त्या बोल होते. त्या म्हणाल्या, "जेव्हाही मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही अडथळे आले. महिला राज्यपालांसोबत कसा भेदभाव केला गेला हे तेलंगणाच्या इतिहासात लिहिलं जाईल.

दरम्यान, राज्यपालांच्या गंभीर आरोपांवर तेलंगणा राष्ट्र समिती आणि केसीआर यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सुंदरराजन या तामिळनाडू भाजपच्या प्रमुख असल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

Web Title: Telangana Governor Accuses Kcr Government Of Gender Discrimination

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpTelanganaGovernorKCR