

Police investigation underway after reports of mass poisoning and killing of nearly 300 stray dogs in Telangana’s Hanamkonda district.
esakal
तेलंगणाच्या हणमकोंडा जिल्ह्यात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या गंभीर घटनेसंदर्भात पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की हे प्रकरण प्राण्यांवरील क्रूरतेशी संबंधित आहे आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे. प्राणी कल्याण कार्यकर्ते अदुलापुरम गौतम आणि फरजाना बेगम यांनी ९ जानेवारी रोजी श्यामपेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.