
हैदराबाद : टोमॅटो, आंबा, टरबूज आणि अननस यांसारख्या विविध प्रकारांच्या सहा फळांपासून मद्य बनवण्याच्या प्रस्तावावर तेलंगण सरकार विचार करीत आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकताच तयार करण्यात आला आहे. यासाठी विद्यमान उत्पादन शुल्क नियमांनुसार अशा उत्पादकांसाठी आवश्यक असलेल्या नियमांवर आणि परवानगीसाठी अधिकारी काम करीत आहेत. फळे आणि फुलांपासून मद्य तयार करताना कोणती खबरदारी घ्यावी यावरही विचार सुरू आहे.