POCSO Accused Endlife : 'पोक्सो'च्या आरोपीकडून अवघ्या अर्ध्या तासात पीडितेसह ६ जणांची निर्घृण हत्या; स्वत:ही विष प्राशन करुन जीवन संपविले

Ranga Reddy Killings : स्वतःच्या पत्नी आणि दोन मुलांचीही गळा चिरून हत्या करत एकूण सहा जणांचा जीव घेतला. गुन्ह्यानंतर त्याने वडिलांना फोन करून कबुली दिली आणि स्वतः ही जीवन संपविणार असल्याचेही सांगितले.
POCSO Accused Commits Brutal Six Murders in Telangana

POCSO Accused Commits Brutal Six Murders in Telangana

esakal

Updated on

POCSO Accused Commits Brutal Six Murders in Telangana : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या POCSO प्रकरणातील मुख्य आरोपी पी. राजकुमार (३५) याने सहा जणांची निर्घृण हत्या केल्यानंतर जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. कोथूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेन्जरला येथे त्याचा मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ कीटकनाशकाची बाटली आढळून आल्याने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com