सूर्यापेट : तेलंगणातील सूर्यापेट शहरात ऑनर किलिंगची (Suryapet Honor Killing) धक्कादायक घटना उघडकीस आलीये. ममिल्लागड्डा येथील रहिवासी वडलाकोंडा कृष्णा उर्फ माला बंटी या युवकाची अमानुष हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह पिल्ललमरीजवळील मुसी कालव्याच्या काठावर सापडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.