Temple CCTV: तेलंगण सरकारने राज्यातील प्रमुख मंदिरांच्या सुरक्षेसाठी आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे. हैदराबाद येथील कमांड कंट्रोल सेंटरमधून २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.
हैदराबाद: तेलंगण सरकारने राज्यातील प्रसिद्ध मंदिरांची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिरांमध्ये बसवलेले ‘सीसीटीव्ही’ थेट हैदराबादमधील ‘पोलिस कमांड कंट्रोल सेंटर’शी जोडण्यात आले आहेत.