

Andhra Pradesh Women Reservation
ESakal
आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाने राज्यातील सर्व आगामी निवडणुकांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचे वचन दिले आहे. तिकीट वाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव टीडीपीचे कार्याध्यक्ष नारा लोकेश यांनी महानडूमध्ये मांडला.