धक्कादायक! राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची हत्या, 'या' राज्यात खळबळ | Thota Chandraiah murder case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder
धक्कादायक! राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची हत्या, 'या' राज्यात खळबळ

धक्कादायक! राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची हत्या, 'या' राज्यात खळबळ

आंध्रप्रदेश : येथील गुंटूर (Andhrapradesh guntur) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडलीय. तेलगू देसम पक्षाच्या (Telugu Desam Party) एका बड्या नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. थोटा चंद्रैया (Thota Chandraiah murder) असं हत्या झालेल्या नेत्याचं नाव आहे. ही घटना आज गुरुवारी १३ जानेवारीला आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात गुंडलापाडू येथे घडली. चंद्रैया दुचाकीने त्यांच्या गावी जात असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला करुन हत्या केली. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Telugu desam party leader killed Andhrapradesh guntur by unidentified miscreants)

हेही वाचा: मुंबईत नव्या रुग्णसंख्येत किंचीत घसरण; ६ जणांचा मृत्यू

याबाबत सविस्तर वृत्त असं की, थोटा चंद्रैया यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपास सुरु केला आहे. चंद्रैया यांच्या हत्येच्या घटनेचा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निषेध व्यक्त केला असून गुंटूर येथील मर्चेला येथे भेट देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तसंच तेलगू देसम पक्षाकडून चंद्रैया यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत करणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान, २०१९ पासून हत्येचंच राजकारण आंध्रप्रदेश मध्ये सुरु असल्याचा आरोप तेलगू देसम पक्षाने केला आहे. या हत्येच्या घटनेचा तेलगू देसम पक्षाचे नेते लोकेश यांनीही ट्विटरवर निषेध व्यक्त केला असून युवजन श्रमिक रायथू कांग्रेस पार्टीचा या हत्येमागे हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Andhra Pradeshmurder
loading image
go to top