Viral video
Viral video esakal

Viral: भक्ती पडली महागात! हत्तीच्या पायात अडकून पडला, बाहेर येणार कसा?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Temple devotee stuck under elephant staue video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्ती असणे ठीक पण तिचा अतिरेक झाला की काय होते याचा प्रत्यय त्या व्हिडिओतून आल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये जो भक्त अडचणीत सापडला आहे त्याला तर ट्रोल केले जात आहे.

भक्ती ही अनेकदा अंगलट कशी येतेय याचा प्रत्यय त्या व्हिडिओतून येत आहे. हत्तीच्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा त्या भक्ताचा अट्टाहास त्याच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले आहे. हत्तीच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी तो त्या मुर्तीच्या पायाखाली घुसला खरा पण त्यातून त्याला बाहेर पडता येईना. त्यानं बऱ्याचवेळा प्रयत्नही केले पण काही केल्या त्याला बाहेर येता न आल्यानं उपस्थितांचीही चांगलीच दमछाक झाली. त्याला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण यासगळ्यात त्याची अवस्था आणखीनच केविलवाणी झाली होती.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

मंदिराचे पुजारी यांनी यावेळी त्या भक्ताची मदत केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्यांनी बाकीच्या भक्तांना देखील अशाप्रकारे दर्शन घेऊन स्वताचा जीव धोक्यात घालू नये असे सांगितले आहे. कृपया करुन मंदिराचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करु नका. असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आतापर्यत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

Viral video
Mohandas Sukhtankar: 'नटसम्राट' मोहनदास सुखटणकर यांचे निधन

नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहताना त्या भक्ताला बाहेर कसे काढणार हाच प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र त्याला सोडवण्यात यश आले किंवा नाही याविषयी कोणतीही बातमी अद्याप समोर आलेली नाही. दोन वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारची एक घटना घडली होती. त्यावेळी एका महिलेनं आपला जीव धोक्यात घातला होता.

Viral video
Aliya-Ranbir’s daughter: 'राहा'बाबत आलिया अन् रणबीरचा मोठा निर्णय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com