

Supreme Court Calls for New SIT Probe into Alleged Donation Theft
sakal
नवी दिल्ली : राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नव्याने 'एसआयटी' स्थापन करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. दान चोरीचे प्रकरण हे साधे गुन्हेगारीचे प्रकरण आहे. त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी होणे गरजेचे असून या चौकशीचा तार्किक निष्कर्ष निघणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.