Video : धक्कादायक! डोक्यावर पाय ठेवून गुरूजी देताहेत आशीर्वाद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

ओडिशा राज्यातील खोर्धा या जिल्ह्यातील बनपूर या गावात एका मंदिरातील पूजारी आपल्या भक्तांना अजब पद्धतीने आशीर्वाद देताना दिसत आहेत.

खोर्धा (ओडिशा) : दसऱ्या दिवशी सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच, ओडिशातील खोर्धामधल्या बनपूर भागात धक्कादायक प्रकार घडत होता. आपल्या जर कोणी पाया पडले तर त्याच्या डोक्यावर होत ठेवून आशीर्वाद देण्याची परंपरा आहे. मात्र ओडिशातील या आशीर्वाद देण्याच्या प्रकारामुळे देशभरातून त्यावर टीका होत आहे, तसेच हा व्हिडिओही व्हायरल झालाय. 

जेव्हा रेखा यांच्यामुळे जया बच्चन यांनी राज्यसभेत जागा बदलली!

ओडिशा राज्यातील खोर्धा या जिल्ह्यातील बनपूर या गावात एका मंदिरातील पूजारी आपल्या भक्तांना अजब पद्धतीने आशीर्वाद देताना दिसत आहेत. एका रांगेत भक्त बसले आहेत व एक एक करून गुरूजींच्या पाया पडत आहेत. मात्र डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्याऐवजी हे गुरूजी चक्क भक्तांच्या डोक्यावर व पाठीवर पाय ठेवून आशीर्वाद देत आहेत. अशा प्रकारच्या आघोरी आशीर्वादामुळे दसऱ्यादिवशी नक्की काय चाललंय यावर टीका होत आहे. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून. यावर संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे समोर बसलेले भक्तही अगदी तन्मयतेने या गुरूजींचा पाय डोक्यावर ठेवून आशीर्वाद घेत आहेत. या रांगेत लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच वयाचे भक्त आहेत. तर हे गुरूजी साधारण 35 ते 40 वयाचे असतील. या व्हिडिओमुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे, तसेच अशा अघोरी रूढी परंपरांना विरोधही होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A temple priest gives blessings to people by putting his foot on their heads at odhisha