'अनलॉक'साठी केंद्र सरकारचे नवे नियम

unlock 5
unlock 5
Summary

देशात (corona) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या उताराकडे आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने नवे नियम (Terms of unlock) जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली- देशात (corona) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या उताराकडे आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने नवे नियम (Terms of unlock) जाहीर केले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी असणे, तसेच 60 वर्षांपुढील आणि 45 वर्ष वयांपुढील सहव्याधी नागरिकांचे 70 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करता येणार आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) (ICMR) महासंचालक आणि कोविड टास्क फोर्सचे प्रमुख बलराम भार्गव म्हणाले की, जिल्ह्यांनी लसीकरणाला प्राधान्य द्यावे आणि हळूहळू निर्बंध हटवावेत. (Terms of unlock positivity below 5 percent vaccinated 70 per central government)

भार्गव म्हणाले की, कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेला आपल्याला थोपवायचं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. पण, हे हळूहळू करावं लागेल. तसेच असुरक्षित वयोगटातील नागरिकांचे लसीकरण 70 टक्क्यांपेक्षा अधिक होणे आवश्यक आहे आणि इतक्या प्रमाणात लसीकरण झाले नसेल, तर घरोघरी जाऊन लसीकरण करावे.

unlock 5
गुजरातमध्ये 3 वर्षांपूर्वी मृत व्यक्तीला कोरोनाची लस

भारतातील 718 जिल्ह्यांपैकी 344 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 7 मेपर्यंत फक्त 92 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी होता. 13 मेपर्यंत 45 वयोगटापुढील 32 टक्के जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. सध्या 239 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 145 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्क्यांच्यादरम्यान आहे. मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

unlock 5
अंध गिर्यारोहकाने एव्हरेस्ट केले सर

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळत आहे. मे महिन्यामध्ये अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावण्यात निर्णय घेतला होता. पण, आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहे. पण, काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या लाटेनंतर गाफील राहिल्यामुळे दुसरी लाट आली. त्याचा मोठा फटका राज्याला बसला. आता तिसऱ्या लाटेबाबत असं होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार खबरदारी घेताना दिसत आहे. तसेच लसीकरणावर भर दिला जात आहे. जूलै-ऑगस्टदरम्यान मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com