
नवी दिल्ली : पहलगामसह अलीकडील काळात झालेले दहशतवादी हल्ले हे दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीशिवाय अशक्य होते, असा ठपका आंतरराष्ट्रीय आर्थिक कृती गटाने (एफएटीएफ) ठेवला आहे. तसेच, दहशतवादाला आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणाऱ्या या गटाने यावर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेधही केला आहे.