
श्रीनगर : ‘कलम ३७०’ हटविल्यानंतरच्या काश्मीर खोऱ्यातील युवकांमध्ये काही बदल झाल्याचे सुरक्षा यंत्रणांना आढळले आहे. फुटीरतावाद आणि दहशतवादाचे उदात्तीकरण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर येथील युवक करीत असल्याचे यापूर्वी आढळले होते. मात्र, केवळ विशिष्ट विचारसरणीच्या हेतूने हा ‘सोशल मीडिया’चा वापर न करता त्या माध्यमातून जास्तीत जास्त ‘फॉलोअर्स’ आणि त्या माध्यमातून जाहिरातींच्या स्रोताद्वारे उत्पन्नाचा नवा मार्ग तेथे रुजत चालल्याचे चित्र आहे. फुटीरतावाद आणि दहशतवादाचे उदात्तीकरण होत आहेच. मात्र, त्याचसोबत या माध्यमातून सोशल मीडिया हँडल चालवणाऱ्यांना जगभरातून पैसा मिळत असल्याचे दिसून येत आहे.