J&K : पुलवामात चकमकीत एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची कारवाई

जम्मू काश्मीर
J&K : पुलवामात चकमकीत एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची कारवाई

जम्मू काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा (pulwama) जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर (ता.१५) चकमक सुरू झाली. ज्यात एक दहशतवादी मारला गेला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली.

जवानांनी दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील राजपोरा भागातील उसगम पाथरी येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी एक अभियान राबविण्यात आले. नाकाबंदी होत असल्याचे पाहून लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जवानांनी दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलांकडून आत्मसमर्पण करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र दहशतवाद्यांना ते मान्य नव्हते आणि त्यांनी मधूनमधून गोळीबार सुरूच ठेवला. यादरम्यान एक दहशतवादी मारला गेला. सध्या हे ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला आहे

एके-47 रायफल, चार मॅगझिन, एक ग्रेनेड जप्त

याआधी, राजोरी आणि पूंछमध्ये दहशतवादी घटनांसाठी विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला मंगळवारी बहरमगला भागात सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार केले. त्याचा एक साथीदार जंगलात पळून गेला. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. रात्री उशिरापर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू होती. अबू जरारा असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून एक एके-47 रायफल, चार मॅगझिन, एक ग्रेनेड, एक पाउच, काही रुपये भारतीय चलन जप्त करण्यात आले आहे.

आठवा दहशतवादी

संरक्षण सूत्रांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल, लष्कर आणि पोलिसांना बैहरामगला भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. यावर लष्कराच्या 16 आरआर, एसओजी आणि सुरनकोट पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. काही वेळातच एक दहशतवादी मारला गेला. या वर्षातील राजोरी-पुंछमध्ये मारला गेलेला हा आठवा दहशतवादी आहे. अबू जराराला पीर पंजालच्या दक्षिण भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.

J&K : पुलवामात चकमकीत एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची कारवाई
ओमिक्रॉन संसर्गाचा वेग चिंता वाढवणारा; WHO चा सावधानतेचा इशारा

दहशतवादाला खतपाणी घालण्याचे पाकिस्तानकडून प्रयत्न

याआधी राजोरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा कुख्यात गाईड हाजी आरिफही मारला गेल्याचे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. राजोरी-पुंछमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचे पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत. अबू जराराच्या हत्येत स्थानिक लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. वेळीच अचूक माहिती मिळाल्यानंतरच दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पुलवामाच्या राजपुरा भागात ही चकमक झाली.

J&K : पुलवामात चकमकीत एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची कारवाई
China Corona: चीनमध्ये पाच लाख लोकांचे क्वारंटाइन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com