ओमिक्रॉन संसर्गाचा वेग चिंता वाढवणारा; WHO चा सावधानतेचा इशारा

who chief
who chiefFile Photo
Summary

जरी काही देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले नसतील किंवा त्याचे निदान झाले नसले तरी तिथे ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असल्याची शंका जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.

जिनिव्हा - जागतिक आऱोग्य संघटनेनं (WHO) कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. WHO ने म्हटलं की, ओमिक्रॉन बहुतांश देशांमध्ये पोहोचला असून प्रचंड वेगाने तो पसरत आहे. भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. आफ्रिकी देशातच नाही तर ओमिक्रॉनचे रुग्ण अमेरिका (USA), युरोपातही (Europe) वेगाने आढळून येत आहेत. भारतातील (India) ओमिक्रॉन बाधितांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, वास्तव हेच आहे की, ओमिक्रॉन अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. जरी काही देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले नसतील किंवा त्याचे निदान झाले नसले तरी तिथे ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असल्याची शंका जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गॅब्रेसस यांनी मंगळवारी माहिती देताना सांगितलं की, सध्या ७७ देशांनी त्यांच्याकडे ओमिक्रॉन रुग्ण असल्याचं अधिकृतपणे सांगितलं आहे. ओमिक्रॉन हा खूपच वेगाने पसरत आहे. इतक्या वेगाने या आधी कोणत्याही व्हेरिअंटचा प्रसार झाला नाही असंही जागतिक आऱोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

who chief
China Corona: चीनमध्ये पाच लाख लोकांचे क्वारंटाइन

ओमिक्रॉन व्हेरिअंट हा डेल्टाला रुग्णसंख्ये बाबतीत मागे टाकू शकतो असंही WHO ने म्हटलं आहे. सध्याचे चाचणीचे तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरिअंटला रोखता येऊ शकतं. ओमिक्रॉन इतर व्हेरिअंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य असल्याचं याआधीच घोषित करण्यात आलं आहे. मात्र, या व्हेरिअंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी असल्याचंही म्हटलं आहे. ओमिक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये कमी लक्षणं किंवा काहीच लक्षण आढळून येत नाहीत.

who chief
पर्यावरण बदलाच्या ठरावाला रशियाचा ‘खो’

टेड्रोस यांनी सांगितलं की, आम्ही बूस्टर डोस देण्याच्या विरोधात नाही. मात्र लसीकरणात असलेल्या असमानतेमुळे चिंता वाटते. फक्त लस कोणत्याही देशाला या संकटातून बाहेर काढू शकत नाही. देशांना ओमिक्रॉनचा प्रसार रोखावा लागेल. अनेक देशांमध्ये लसीकरणाचा दर खूप कमी आहे. ४१ देशात अजुनही लस १० टक्के पात्र लोकांपर्यंत पोहोचली नाही. तर ९८ देशात अजुनही ४० टक्के लोकसंख्येला लस मिळालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com