दहशतवादी संघटनेकडे युवकांचा वाढता ओढा; काश्‍मीरमधील स्थिती

पीटीआय
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

काश्‍मीर खोऱ्यातील युवकांचा दहशतवादी संघटनांकडे ओढा वाढत चालला असून यावर्षी सात महिन्यांत 130 युवक विविध दहशतवादी संघटनेत सामील झाले असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी 126 युवकांनी बंदूक उचलली होती आणि हा आकडा 2010 च्या तुलनेत सर्वाधिक होता. 
 

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यातील युवकांचा दहशतवादी संघटनांकडे ओढा वाढत चालला असून यावर्षी सात महिन्यांत 130 युवक विविध दहशतवादी संघटनेत सामील झाले असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी 126 युवकांनी बंदूक उचलली होती आणि हा आकडा 2010 च्या तुलनेत सर्वाधिक होता. 

काश्‍मीरमधील युवकांनी दहशतवादी चळवळ किंवा कारवायात सहभागी होऊ नये, यासाठी सरकारी आणि लष्कराच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. दहशतवादी संघटनेत सहभागी होणारे सर्वाधिक तरुण हे दक्षिण काश्‍मीरमधील चार जिल्ह्यांतील पुलवामा, शोपियॉं, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील आहेत. शोपियॉं, पुलवामा या दोन जिल्ह्यांतील सुमारे 70 टक्के युवक भरती होत आहेत. दक्षिण काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या भरतीचे प्रमाण वाढल्याने चकमकीदेखील वाढत चालल्या आहेत. एक एप्रिलला झालेल्या दोन चकमकीत 13 दहशतवादी मारले गेले होते. त्यात हिज्बुलचा कमांडर सद्दाम पड्डर आणि प्रोफेसरचा दहशतवादी झालेला मोहंमद रफीचा समावेश आहे. लष्कराने अनेक मोहिमा यशस्वी केल्या असल्या तरी दहशतवाद्यांकडे युवकांचा ओढा वाढतच चालला असून तो चिंताजनक आहे. 2016 च्या जुलैमध्ये हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर युवकांची दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर लष्करे तैयबामध्ये किमान 25 नव्याने दहशतवादी झाले आहेत. पूर्वी निष्क्रिय असलेल्या अल बदर दहशतवादी संघटनेत आता नऊ युवक सहभागी झाले आहेत. 

दहशतवादी संघटनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या 
वर्ष: युवक 
2010: 54 
2011: 23 
2012: 21 
2013: 16 
2014: 53 
2015: 66 
2016: 88 
2017: 126 
2018: 131 (जुलैपर्यंत) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist organization draws youths, Status in Kashmir