जम्मू-काश्मीर : दारूच्या दुकानावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

terrorists attacked wine shop with grenade in baramulla high security area

जम्मू-काश्मीर : दारूच्या दुकानावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जण ठार

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका दारूच्या दुकानावर ग्रेनेडने हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात किमान एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बारामुल्लामध्ये ज्या भागात दहशतवाद्यांनी दुकानावर ग्रेनेडने हल्ला केला तो भाग अतिशय सुरक्षित मानला जातो.

रात्री साडेआठ वाजता कोर्ट रोडवर असलेल्या एका दारूच्या दुकानावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, त्यात तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक माहितीची मिळणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील दिवाणबाग भागातील आहे. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी हाय सेक्युरीट झओनची नाकेबंदी करण्यात आली.

ज्या भागात दहशतवाद्यांनी दारूच्या दुकानावर ग्रेनेडने हल्ला केला त्या परिसरात बारामुल्लाचे डीआयजी, एसएसपी आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे.

हेही वाचा: राणांसोबत जे झालं त्यावर गप्प का? फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सवाल

गेल्या रविवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील अमीराकदल मार्केटमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला होता. या घटनेत सुमारे दोन डझन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे.

हेही वाचा: स्मृती इराणींविरोधात आंदोलन भोवलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Web Title: Terrorists Attacked Wine Shop With Grenade In Baramulla High Security Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jammu And Kashmir
go to top