

Handbrake Lapse Leads to Fatal Mishap
Esakal
पार्क केलेली थार हँडब्रेक न लावल्यानं मागे गेल्यानंतर भिंत आणि थारच्या मधे चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद इथला हा व्हिडीओ आहे. नातू थार घेऊन येताच आजीने गेट उघडलं.त्यानतंर नातवाने थार पार्क केली आणि आजीने गेट बंद केलं. दरम्यान, थार अचानक मागे येते आणि आजीला चिरडल्याचं दिसून येतं. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.