भरधाव थारची कारला धडक, एकाचा मृत्यू; तरुणी चालवत होती थार, अपघातानंतर सीट बदलली

Thar Accident Video Viral : गोव्यात सोमवारी झालेल्या थार अपघातात एका ६५ वर्षीय वृद्ध पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. थार गाडीत ४ तरुणी आणि एक तरुण होता.
Speeding Thar Hits Vehicle In Goa One Dead

Speeding Thar Hits Vehicle In Goa One Dead

Esakal

Updated on

नॉर्थ गोव्यात पर्यटकांनी भाड्यानं घेतलेल्या थार गाडीने ह्युंडाइ कारला धडक दिल्यानं एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव भगतराम शर्मा असं आहे. भगतराम त्यांच्या कुटुंबियांसह गोव्यात फिरायला आले असताना ही घटना घडलीय. भगतराम हे गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com