"समझोता'नंतर थार एक्‍स्प्रेसही बंद 

एएनआय
Saturday, 10 August 2019

पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडले असून, काल (ता. 9) दिल्ली- लाहोर दरम्यान धावणारी समझोता एक्‍स्प्रेस बंद करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत थार एक्‍स्प्रेसही बंद केली. मी रेल्वेमंत्री असेपर्यंत पाकिस्तानमधून भारतात रेल्वे गाडी जाणारच नाही, असेही अहमद म्हणाले.

इस्लामाबाद : भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर विविध पातळ्यांवरील संबंध तोडण्याचा सपाटा पाकिस्तानने लावला असून, त्यांनी समझोता एक्‍स्प्रेसनंतर कराची ते जोधपूर मार्गावर धावणारी थार एक्‍स्प्रेसही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडले असून, काल (ता. 9) दिल्ली- लाहोर दरम्यान धावणारी समझोता एक्‍स्प्रेस बंद करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत थार एक्‍स्प्रेसही बंद केली. मी रेल्वेमंत्री असेपर्यंत पाकिस्तानमधून भारतात रेल्वे गाडी जाणारच नाही, असेही अहमद म्हणाले.

पाकिस्तान सरकारने भारताबरोबरील सांस्कृतिक देवाण-घेवाणही संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण विभागाने "भारत नको' अशी मोहीमच सुरू केली असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांमधील मनोरंजन उद्योगांदरम्यानचे व्यवहार थांबविण्यात आले आहेत. भारताच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून पाकिस्तानी युवकांची मने कलुषित होतात, असा दावाही पाकिस्तानने केला आहे. "भारताची ही सांस्कृतिक घुसखोरी रोखण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. भारताच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीविरोधात लढण्यासाठी मंत्र्यांचा एक गट स्थापन केला जाणार आहे,' असेही या वेळी सांगण्यात आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thar express also cancels by Pakistan after Samjhauta Express