Delhi Crime : दिल्लीतील दुर्घटनेवेळी २० वर्षीय तरुणी स्कूटरवर एकटी नव्हती, पोलीस तपासात नवी माहिती समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Crime

Delhi Crime : दिल्लीतील दुर्घटनेवेळी २० वर्षीय तरुणी स्कूटरवर एकटी नव्हती, पोलीस तपासात नवी माहिती समोर

३१ डिसेंबरच्या रात्री दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने एका तरुणीचा मृत्यू झालाय, ते पाहून देश हादरुन गेला. याप्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलेलं असून यंत्रणेला आदेश दिले आहेत. यामध्ये नवनवे खुलासे समोर येत आहेत. स्कूटीवर पीडितेसोबत तिची आणखी एक मैत्रीण तिच्यासोबत प्रवास करत होती, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री शनिवारी मध्यरात्री कांजवाला भागात पाच मद्यधुंद तरुण प्रवास करत असलेल्या ग्रे रंगाच्या बलेनो कारसोबत त्यांच्या स्कूटीची धडक झाली होती. यामध्ये पहिल्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आणि भीतीपोटी ती घटनास्थळावरून पळून गेली, तर दुसरी मुलगी धडकेनंतर कारसमोर पडली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तिचे पाय बलेनो कारच्या चाकात अडकले आणि त्यानंतर तिला चालत्या गाडीसोबत जवळपास 10 ते 12 किमी अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले, यातच तिचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Jammu and Kashmir: दहशतवादी हल्ल्यांत ITBP जवानाच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू

पोलिसांनी काल (सोमवारी) संध्याकाळी दुसऱ्या मुलीचा शोध घेतला आहे. मंगळवारी अधिकृतरीत्या तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. अपघातापूर्वी दोघी तरुणी काही मित्रांसह वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या हॉटेलमध्ये ती उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिच्या या मित्रांचीही चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Delhi Crime : तरुणीला फरफटत नेलेली 'ती' कार कोणाची? दिल्ली पोलिसांच्या तपासाची दिशा ठरली

या मुलीच्या मृत्यूवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच, केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरोरा यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली आहे. विशेष पोलीस आयुक्त शालिनी सिंह या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनीही तपासाचा आढावा घेतला आहे.

हेही वाचा: 'नंगटपणा हा....', अमृता फडणवीसांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करत अंधारे म्हणाल्या...

टॅग्स :crimeaccidentdelhi