esakal | 'मोदींच्या निर्णयामुळे शेकडोंचे जीव वाचले', ऑस्ट्रेलियन माध्यमांना भारताने खडसावलं
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

'मोदींच्या निर्णयामुळे शेकडोंचे जीव वाचले', ऑस्ट्रेलियन माध्यमांना भारताने खडसावलं

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय भयावह आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तर तीन हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळेही रुग्णांची परवड होत आहे. भारतामधील कोरोना संकाटाला ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवत, याबाबतचा एक लेख छापला आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायोगानं याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय उच्चायोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. उच्चायोगानं ऑस्ट्रेलियन मिडियानं छापलेल्या रिपोर्टला आधारहीन, दुर्भावनापूर्ण आणि निंदनीय म्हटलं आहे.

''लॉकडाउन हटवून मोदी यांनी भारताला सर्वनाशाकडे ढकलेय'' या मथळ्याकाली सोमवारी ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध झाला होता. कुंभमेळा आणि निवडणूक प्रचारसभा- रॅली भारतामधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असल्याचं लेखात म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याला दुर्लक्ष केल्याचा ठपकाही या लेखात ठेवला आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायोगानं सोमवारी वृत्तमानपत्राचे संपादक क्रिस्टोफर डोरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये कोरोना लढाईमध्ये भारतानं अवलंबलेल्या पद्धतीला चुकीचं म्हटल्याचा आरोप केला. कोरोनावर मात करण्यासाठी भारतानं अनेक उपाययोजना केल्या आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउनपासून यंदा सुरु असलेल्या लसीकरणापर्यंतच्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा पत्रात मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णायामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले असून याचं जगभरातून कौतुक करण्यात आलं आहे, असेही पत्रात म्हटलं आहे.

भारतामध्ये कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय भयावह असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच आहे. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मागील 24 तासांत देशांमध्ये तीन लाख 23 हजार 144 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी 76 लाख 36 हजार 307 इतकी झाली आहे. देशात सध्या 28 लैख 82 हजार रुग्ण उपचाराधिन आहेत. मागील 24 तासांत देशात 2771 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्षभरात कोरोनामुळे एक लाख 97 हजार 894 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.

loading image