जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली; ७ जवान ठार

The bus carrying 26 soldiers fell into the river and 7 young men killed
The bus carrying 26 soldiers fell into the river and 7 young men killedThe bus carrying 26 soldiers fell into the river and 7 young men killed

लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत (river) पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू (seven soldiers killed) झाला आहे. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला. (The bus carrying 26 soldiers fell into the river and seven soldiers killed) (The bus carrying 26 soldiers fell into the river and 7 young men killed)

लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत (river) पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत (seven soldiers killed) घोषित करण्यात आले आहेत.

इतर जवानही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात येत आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

The bus carrying 26 soldiers fell into the river and 7 young men killed
Unlucky Plants : चुकूनही घरात लावू नका ही झाडे; होईल नुकसान

२६ जवानांचे पथक परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत (river) पडले. गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी वेस्टर्न कमांडकडे पाठवले जाऊ शकते.

The bus carrying 26 soldiers fell into the river and 7 young men killed
मुस्लिम मुलीशी प्रेम केल्याने हिंदू मुलाची निर्घृण हत्या; तिघांना अटक

भाड्याने घेतले होते वाहन

आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ज्यामध्ये सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले. सैन्याने सैनिकांना नेण्यासाठी हे खाजगी वाहन भाड्याने घेतले होते. हे वाहन रस्त्यावरून घसरले आणि खोल दरीत पडले, असे नुब्रा पोलिस स्टेशनचे एसएचओ स्टॅनझिन दोरजे म्हणाले.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात?

जखमी जवानांना परिसरातील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रथमदृष्ट्या हा अपघात चालकाच्या निष्काळजीमुळे झाल्याचे दिसत आहे, असेही दोरजे म्हणाले. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक गंभीर जखमींना उच्च केंद्रात पाठवण्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे, असे भारतीय लष्कराने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com