Tajmahal : ताजचा 'गुमनाम' आर्किटेक्ट! शाहजहांचा स्वप्नपूर्तीसाठी इराणहून आला होता हा कलाकार; वाचा थक्क करणारी कहाणी

प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालाच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला मोहिनी घातली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या वास्तूचा नक्षा कोठे तयार झाला.
tajmahal architect

tajmahal architect

sakal

Updated on

प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालाच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला मोहिनी घातली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की आग्र्यात उभ्या असलेल्या या वास्तूचा नक्षा चक्क इराणची राजधानी तेहरानच्या गल्ल्यांमध्ये तयार झाला होता?

ताजमहाल म्हटलं की आपल्याला मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताजची आठवण येते. पण या भव्य इमारतीचा खरा 'मास्टरमाइंड' एक इराणी वास्तुविशारद होता, ज्याचे नाव होते उस्ताद अहमद लाहोरी. इतिहासाच्या पानात या नावाचा उल्लेख कमीच आढळतो, पण ताजमहाल आणि दिल्लीचा लाल किल्ला या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंचा नक्षा याच माणसाने तयार केला होता. शाहजहानने त्याला 'नादिर-उल-असर' म्हणजेच 'काळातील सर्वात अनोखा कलाकार' ही पदवी दिली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com