
Viral : कबूल है! लग्नसोहळ्यानंतर नवरदेव शौचालयातूनच फरार
एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याच्या वचनासह थाटामाटात आणि विधीवत झालेला सोहळा म्हणजे लग्न. मात्र एका जोडप्याच्या लग्नाच्या बाबतीत असं काहीसं घडलं नाही. लग्नाच्या विधी तर पार पडल्या खऱ्या पण त्यानंतर जे घडलं ते लग्न घरातील पाहुण्यांना चकीत करणारं होतं. 'कबूल है कबूल है कबूल है...' म्हणत लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या होत्या. लग्नाच्या विधी आटोपल्यानंतर नवरदेव शौचालयाकडे गेला आणि परतलाच नाही. लग्नासोहळ्याचा आनंद जणू दुख:त बदलला. (The groom ran away from nikah without bride)
केवळ नवरदेवच नाही तर त्याचे वडीलही फरार
केवळ नवरदेवच नाही तर त्याचे वडीलही लग्नसोहळ्यातून यावेळी फरार होते. इस्लामनगरमधील ही घटना चांगलीच चर्चेत आहे. नवरदेव आणि त्याच्या सोबतीच्या वऱ्याड्यांनी जेवण केले आणि हळू हळू सगळेच लग्नातून घरी परतायला सुरूवात झाली. शौचालयाच्या निमित्ताने नवरदेव घराबाहेर पडला आणि फरार झाला. हे प्रकरण नंतर ग्रामपंचायतीत पोहोचलं. तीन दिवस नवरीला सासरी नेण्याबाबत प्रयत्न सुरू राहिले. नवरदेवाच्या वडीलांनी यावेळी हातझटकणी करत नवऱ्या मुलीची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या लोकांवर सोडली.
थाटामाटात काढली होती नवदेवाची वरात
शाहबाद क्षेत्रातील एका गावातील निवासी तरूणाची वरात २५ जुलैच्या रात्री लग्नघरी पोहोचली. बँड बाज्यासह या नवरदेवाची वरात निघाली होती. त्यानंतर नवरदेव आणि सोबत आलेल्या वर्हाड्यांनी जेवण केले. उशिरा रात्री मुस्लिम धर्मिय जोडप्याच्या लग्नाच्या विधीला सुरूवात झाली. कबूल है..म्हणत लग्न पार पडलं. रात्री फार उशीरापर्यंत चाललेल्या या लग्नानंतर नवरदेवासोबतचे वऱ्हाडी घरी परतले. फक्त नवरदेवाचे कुटुंबिय लग्नघरी थांबले होते. उशीरा रात्री शौचालयाला जातो सांगून नवरदेव तेथून फरार झाला. त्याचे वडीलही संधी साधत फरार झाले. उशीरा रात्रीपर्यंत जेव्हा हे दोघे परतले नाही तेव्हा नवरीचे आईवडील चिंतेत पडले. जेव्हा नवरदेवाच्या नातलगांना फोन लावला तेव्हा नवरीला न घेताच ही मंडळी परतल्याचं प्रकरण पुढे आलं.
हेही वाचा: हुंडा न मिळाल्यानं मुलानं लग्नाला दिला नकार; मुलीनं घेतला गळफास
या घटनेनंतर लग्नघराचा आनंद दुखात बदलला. नवरीजवळ दागिणे नाहीत म्हणून तिला सोबत न घेताच वऱ्हाडी परतल्याचे नातेवाईकांकडून कळले. नंतर चौकशी केल्यावर कळले की ३०० वऱ्हाडी येणार असल्याचे सांगितल्या गेले होते. मात्र फक्त ८ वऱ्हाडीच लग्नात हजर होते. हुंड्यात बाईक नव्हती म्हणून नवरीला सोबत न घेताच परतल्याचीही चर्चा यावेळी रंगली होती. या प्रकरणानंतर नवऱ्या मुलीच्या आईवडीलांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती.
Web Title: The Groom Ran Away From Nikah Marriage Without Bride Matter Goes Towards Panchayat Then
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..