esakal | कोरोनातून बरे झालेल्यांंचं लशीकरण कधी? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

बोलून बातमी शोधा

कोरोनातून बरे झालेल्यांंचं लशीकरण कधी? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट
कोरोनातून बरे झालेल्यांंचं लशीकरण कधी? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढतोच आहे. दररोज सुमारे साडेतीन लाखहून अधिक रुग्ण देशामध्ये आढळून येत आहेत. तर दुसरीकडे देशातील लशीकरणाची प्रक्रिया देखील गतीने सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्यातून बरे झालेल्या लोकांना लस कधी दिली जाईल? या संदर्भात आता सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. सरकारने म्हटलंय की, कोरोनाची लक्षणे पूर्णपणे समाप्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते.

हेही वाचा: महाराष्ट्रासाठी खुशखबर! सर्वांना मिळणार मोफत लस

लोकांनी विचारला हा प्रश्न

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाहीर केली आहेत. या अंतर्गत लोक विचारत होते की, कोरोनाच्या संक्रमणातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये रिकव्हरीनंतर कोरोनाचे लशीकरण करणे कधी योग्य ठरेल? लोकांचं म्हणणं होतं की, कोरोना संक्रमणाची हिस्ट्री असणाऱ्या रोग्यांना देखील कोरोना प्रतिबंधक क्षमता निर्माण होण्यासाठी कोरोना लशीकरणाची आवश्यकता आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आरोग्य मंत्रालयाने म्हटंलय की, सध्या कोरोना संक्रमणानंतर रोग प्रतिकारक शक्तीच्या विकासासाठीची माहिती तसेच सुरक्षित काळ प्रमाणित नाहीये. अशात कोरोना रुग्णांची लक्षणे समाप्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यानंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते. मात्र, आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलं नाहीये की, जर एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल अथवा तिच्यात लक्षणे असतील तर तिला लस दिली जाऊ नये.