Arunachal Pradesh : अरुणाचलमध्ये लोकशाहीचे दुर्लक्षित ‘एएलसी’ नायक ; दुर्गम भागांत ब्रिटिशकालीन यंत्रणेचा आधार

देशाच्या ईशान्येकडील दुर्गम, पर्वतमय राज्यांत निवडणुका घेणे हे आव्हानच असते. अरुणाचल प्रदेशात ऑक्झिलरी लेबर कोअर (एएलसी) ही कामगारांची तुकडी निवडणूक आयोग व मतदार यामधील दुवा म्हणून काम करत आहे.
Arunachal Pradesh
Arunachal Pradeshsakal

इटानगर : देशाच्या ईशान्येकडील दुर्गम, पर्वतमय राज्यांत निवडणुका घेणे हे आव्हानच असते. अरुणाचल प्रदेशात ऑक्झिलरी लेबर कोअर (एएलसी) ही कामगारांची तुकडी निवडणूक आयोग व मतदार यामधील दुवा म्हणून काम करत आहे. या पर्वतमय राज्यात निवडणुकीचे साहित्य, रेशनपासून ईव्हीएम नेण्यापर्यंतचे काम ‘एएलसी’मधील जवळपास तीन हजार कामगार करत आहेत. अरुणाचल प्रदेशातील २२८ मतदान केंद्रांवर हे कामगार सर्व साहित्य पोचवीत आहेत.

अरुणाचल प्रदेशातील दोन लोकसभा आणि ६० विधानसभा मतदारसंघांसाठी १९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पवनकुमार सैन म्हणाले, की अरुणाचल प्रदेशातील अत्यंत दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर चालत जावे लागते. त्यामुळे, या केंद्रांवर ‘एएलसी’मधील कामगारांकडून निवडणुकीचे साहित्य पायी पोचविले जाते. सहनिवडणूक अधिकारी लिकेन कोयू म्हणाले, की अरुणाचल प्रदेशातील या दुर्गम, खडकाळ भागात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ‘एएलसी’ सरकार आणि मतदारांमधील दुवा म्हणून काम करत आहे.

Arunachal Pradesh
Loksabha Election 2024 : पंतप्रधानांच्या ‘गृहराज्या’ त वाद ; उमेदवार निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचे उघड

सर्वप्रथम ब्रिटिशांनी साहित्य वाहून नेण्यासाठी ‘एएलसी’ची स्थापना केली होती. अरुणाचल प्रदेशची १९८७ मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती झाल्यानंतर ‘एएलसी’मधील नियमित नियुक्त्या थांबविण्यात आल्या. आता, कामगारांच्या तात्पुरत्या नियुक्त्या केल्या जातात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य व साहित्य नेण्यासाठी तसेच निवडणुकांत नवीन प्रशासकीय केंद्रे सुरू करण्यासाठी ‘एएलसी’ची गरज भासते.

यापूर्वी, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत २,१०० कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. तर २०१४ मधील निवडणुकीत १,४०० कामगारांची मदत घेण्यात आली होती. गरजेनुसार संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून या कामगारांची नियुक्ती केली जात आहे, असेही कोयू यांनी नमूद केले. या कामगारांना तीन दिवसांच्या परिश्रमानंतर दुर्गम भागातून ईव्हीएम न्यावे लागत असल्याने अरुणाचल प्रदेशातील अनेक जागांवरील निकाल जाहीर करण्यास उशीर होतो. २२८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी चार कामगारांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.

लोकशाही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या दुर्लक्षित नायकांचे योगदान मान्य करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. या राज्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही पायी प्रवास करावा लागतो. या कामगारांबरोबरच कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी हंगामी मजुरांचीही नियुक्ती केली जाते.

दुर्गम भागांतील

मतदान केंद्रे

२२८

पायी दोन दिवस

लागणारी केंद्रे

६१

पायी तीन दिवस

लागणारी केंद्रे

‘एएलसी’मधील कामगार

२०२४ ; ३,०००

२०१९ ; २,१००

२०१४ ; १,४००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com