
ज्ञानव्यापी मशीद वाद : पुजाऱ्याने कुंडात उडी मारून वाचवले होते शिवलिंग
मुंबई : १८ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिरावर हल्ला करण्याचे फरमान काढले होते. औरंगजेबाच्या फौजेने पूर्ण मंदिर उद्ध्वस्त केले मात्र तरीही येथील स्वयंभू ज्योतिर्लिंग सुरक्षित राहिले. मंदिराच्या पुजाऱ्याने ज्योतिर्लिंगासह ज्ञानव्यापी कुंडात उडी मारल्याने हे ज्योतिर्लिंग सुरक्षित राहिल्याचे सांगितले जाते. ही कथा लंडनचे के के एम ए शेरिंग यांच्या 'सॅक्रेड सिटी ऑफ द हिंदूज' या पुस्तकात सांगण्यात आली आहे. खाली दिलेले ज्ञानव्यापी कुंडाचे छायाचित्र १९००व्या शतकातील आहे.

dnyanvyapee kund
ज्योतिर्लिंगाला हानी पाहोचवता न आल्याने औरंगजेबाच्या फौजेने ५ फुटांच्या दगडी नंदीवर हल्ला केला. अनेक घाव सोसूनही नंदी काही जागचा हलला नाही. शेवट फौजेने गुडघे टेकले व नंदीला तेथेच सोडले. खाली दिलेले छायाचित्र स्वातंत्र्यापूर्वीचे आहे.

nandee
ज्ञानव्यापीचे हे चित्र अँग्लो-इंडियन विचारवंत जेम्स प्रिन्सेप याने १८३४ साली काढले होते. हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या विश्वनाथ मंदिराचे अवशेष या चित्रात दाखवण्यात आले आहेत. यात मशिदीचा मोठा घुमट व बाहेर तुटलेल्या अवशेषांवर बसलेले लोक दिसत आहेत. तुटलेल्या भागाची भिंत आता ज्ञानव्यापी मशिदीत आहे.

dnyanvyapee
ब्रिटीश लायब्ररीत असलेला हा काशी विश्वनाथ मंदिराचा नकाशा. यात गर्भगृह मधोमध दाखवण्यात आले असून त्यावर इंग्रजीत महादेव लिहिले आहे. भोवताली इतर मंदिरे उभी आहेत. हा नकाशा १८३२ तयार करण्यात आला होता. The doted line shows the portion of the temple occupied by the present masjid, असा संदेश या नकाशाच्या खाली लिहिण्यात आला आहे.

mandir map
खालील चित्रात ज्ञानव्यापी कुंडात पूजा करण्यासाठी पुजारी जमलेले दिसत आहेत. १८८० साली काढलेले हे छायाचित्र आहे. यात मंदिराच्या वरच्या बाजूला मशिदीचा काही भाग दिसत आहे.

dnyanvyapee