esakal | स्पुटनिक लस आता राज्यातील 'या' शहरांमध्येही होणार उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

sputnik v covid-19 vaccine

खूशखबर! स्पुटनिक आता राज्यातील 'या' दोन शहरांमध्ये मिळणार

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : स्पुटनिक-व्ही (Sputnik v) लसीचं उत्पादन आता भारतातही सुरु झालं आहे. त्यामुळं कोविशिल्ड-कोव्हॅक्सिननंतर आता स्पुटनिक लसही भारतीयांसाठी उपलब्ध झाली आहे. आत्तापर्यंत ही लस केवळ हैदराबाद (Hyderabad) शहरातच उपलब्ध होती. मात्र, आता ती इतर आणखी महत्वाच्या शहरांमध्येही उपलब्ध होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. डॉ. रेड्डी लॅबनं बुधवारी ही माहिती दिली. (The Sputnik vaccine will now be available in this cities of Maharashtra)

भारतात दाखल झाल्यानंतर ही लस पहिल्यांदा हैदराबादमध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आता ती बंगळुरु, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, कोल्हापूर आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे. पण, कोविन अॅपवर या लसीची नोंदणी अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. व्यावसायिक स्वरुपात लॉन्च झाल्यानंतर तिची नोंदणी सुरु होईल, असं डॉ. रेड्डी लॅबनं स्पष्ट केलं आहे.

loading image