Steel Man of India : प्रसिद्ध उद्योगपती जमशेद जे इराणी यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jamshed J irani
Steel Man of India : प्रसिद्ध उद्योगपती जमशेद जे इराणी यांचं निधन

Steel Man of India : प्रसिद्ध उद्योगपती जमशेद जे इराणी यांचं निधन

भारताचे स्टील मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे उद्योगपती जमशेद जे इराणी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. टाटा स्टीलने एक निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. गेल्या जवळपास ४ दशकांपासून ते टाटा स्टीलशी संलग्न होते.

हेही वाचा: Belgaum : सीमा भागातल्या लोकांची नाराजी, महाराष्ट्र सरकारने एकटं पाडल्याची भावना

जमशेद इराणी जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळामधून निवृत्त झाले होते. त्यांनी या ठिकाणी ४३ वर्षे काम केलं होतं. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. २ जून १९३६ रोजी नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी परदेशात जाऊन पुढील शिक्षण घेतलं आणि आपल्या करिअरची सुरुवात ब्रिटीश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनमधून १९६३ साली केली.

हेही वाचा: Devendra Fadnavis : "...तर भाजपाने खोऱ्याने पैसा ओढला असता"; Elon Musk ला केलं रिट्वीट

त्यानंतर भारतात परतून त्यांनी टाटा स्टील कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी टाटा गृपच्या काही कंपन्यांचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी आणि तीन मुलं जुबिन, निलोफर आणि तनाझ असा परिवार आहे.

टॅग्स :Tata Group