Omicron च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!

'ओमिक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!
Omicron च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!
Omicron च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!esakal
Summary

कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या प्रकाराच्या धोक्‍याची पूर्वसूचना असताना देखील त्यास न जुमानता भारतीय साखर उद्योग यंदाच्या हंगामात साखर निर्यातीबाबत आशावादी आहे.

माळीनगर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) 'ओमिक्रॉन' (Omicron) या प्रकाराच्या धोक्‍याची पूर्वसूचना असताना देखील त्यास न जुमानता भारतीय (Indian) साखर उद्योग (Sugar Industry) यंदाच्या हंगामात साखर निर्यातीबाबत (Export) आशावादी आहे. भारतातून यंदा 60 लाख टन साखर निर्यातीचा साखर उद्योगाचा अंदाज आहे. जगभरात कोरोनाचा उदय व मोठ्या प्रमाणावर प्रसार असूनही गेल्या दोन वर्षात भारतीय साखर उद्योग साखर निर्यातीत मजबूत राहिला आहे.

Omicron च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!
'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर

भारताने 2019-20 च्या हंगामात 59.50 लाख टन तर 2020-21 च्या हंगामात 71 लाख टन इतकी विक्रमी साखर निर्यात केली आहे. या वर्षीच्या हंगामातही भारत मोठ्या प्रमाणावर साखर निर्यातीसाठी उत्सुक आहे. भारतीय साखरेसाठी अनेक आफ्रिकन देशांतील (African countries) मार्केट महत्त्वाचे आहे. त्यापैकी काही देश आफ्रिका खंडातील उत्तर भागात आहेत. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना संसर्गाचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे.

कोरोनाच्या अगोदरच्या दोन लाटांचा साखर निर्यातीवर फारसा परिणाम झाला नाही, याकडे देशातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) लक्ष वेधले आहे. सोमालिया आणि इथिओपिया या आफ्रिकन देशात भारतीय साखरेला चांगली मागणी आहे. भारतीय साखरेला आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात विशेष मार्केट आहे. कोरोना विषाणूचे नव्याने उत्परिवर्तन मुख्यत्वे आफ्रिकेच्या दक्षिण भागात झाले असल्याची बाब पुढे आली आहे. साखर विक्री व निर्यातीवर परिणाम होऊ नये, यासाठी भारतीय साखर उद्योगाने कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी काही मार्ग शोधले आहेत.

Omicron च्या पार्श्वभूमीवर देखील साखर उद्योग निर्यातीसाठी आशावादी!
किती दूर आहे Omicron भारतापासून? 'या' देशांमध्ये आढळून आले रुग्ण

लॉकडाउनच्या काळात मजुरांचा तुटवडा भासत होता. निर्यातीसाठी कंटेनर मिळणे अवघड जात होते. तरीही भारतीय उद्योगाने मागील दोन वर्षात साखर निर्यातीत दमदार कामगिरी केली. कोरोनाच्या नव्या 'ओमिक्रॉन' प्रकाराच्या उदयानंतर सुद्धा चालू हंगामात साखर निर्यात चांगली होईल, अशी आशा 'इस्मा'ला आहे. यंदाच्या हंगामात साखर निर्यातीसाठी 35 लाख टनाचे करार अगोदरच झाले आहेत. यातील अधिकाधिक करार प्रामुख्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखान्यांनी केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com