esakal | परमबीर यांचा पोलिसांवर विश्‍वास नसणे धक्कादायक : सर्वोच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीर यांचा पोलिसांवर विश्‍वास नसणे धक्कादायक : सर्वोच्च न्यायालय

परमबीर यांचा पोलिसांवर विश्‍वास नसणे धक्कादायक : सर्वोच्च न्यायालय

sakal_logo
By
सागर शेलार

नवी दिल्ली ः ‘‘मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह(mumbai police commissioner parambir singh) यांनी पोलिस दलामध्ये तीस वर्षे सेवा करून देखील ते आता स्वतःचा राज्याच्या पोलिस यंत्रणेवर विश्‍वास नसल्याचे सांगत आहेत. स्वतःविरोधातील तक्रारींची चौकशी महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र तपास संस्थेच्या माध्यमातून केली जावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांचे हे वक्तव्य धक्कादायक आहे. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, ‘‘ ती म्हणजे स्वतः काचेच्या घरामध्ये राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकता कामा नये.’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) आजच्या सुनावणीदरम्यान मांडले. परमबीरसिंग यांनी स्वतःविरोधातील सर्वप्रकारची चौकशी राज्याच्या बाहेर हलविण्यात यावी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली असून तिच्यावर आज न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या सुटीकालिन खंडपीठासमोर सुनावणी झाली. (the supreme court has slammed former mumbai police commissioner parambir singh)

आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यावरच कठोर शब्दांत ताशेरे ओढले. न्यायालयाने परमबीर यांची याचिका फेटाळून लावली आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून १७ मार्च रोजी उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर यांना राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख करण्यात आले होते. यानंतर त्यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. यामुळे देशमुखांना राजीनामा देखील द्यावा लागला होता.

हेही वाचा: जगातील पहिला कोविडमुक्त देश ठरल्याची इस्राईलची घोषणा!

परमबीर यांचा युक्तिवाद-आजच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी परमबीरसिंह यांची बाजू मांडली. या गैरव्यवहाराचा माझ्या अशिलांनी भंडाफोड केल्याने ते आता एकामागोमाग एक अशा अन्य खटल्यांना सामोरे जाऊ शकत नाही, असे जेठमलानी यांनी न्यायालयामध्ये सांगितले. सिंह यांच्याविरोधातील सर्वप्रकारच्या चौकशा राज्याबाहेर हलविण्याचे तसेच त्यांचा तपास सीबीआयसारख्या स्वतंत्र संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेश याआधीच देण्यात आले असल्याचे जेठमलानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्यायालय आश्चर्यचकित-जेठमलानी यांच्या युक्तिवादावर न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केले. ‘‘ कधीकाळी तुम्ही देखील महाराष्ट्र केडरचाच घटक होता, तिथे तुम्ही तीस वर्षे काम देखील केले. आता तुम्हीच राज्य पोलिसांवर विश्‍वास नाही असे सांगत आहात. हे धक्कादायक आहे.’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. आज या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली.परमबीरसिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच दिले आहेत, असे जेठमलानी यांनी सांगितले.

तो युक्तिवाद अमान्य-ज्या पत्रातून परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत ते मागे घेतले जावेत म्हणून चौकशी अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला. यावर खंडपीठ म्हणाले की,‘‘ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशमुख आणि परमबीरसिंह यांच्याविरोधातील चौकशी हे दोन भिन्न घटक आहेत. तुम्ही तीस वर्षे पोलिस दलामध्ये नोकरी केली आहे त्यामुळे तुम्ही तरी पोलिसांवर संशय घेता कामा नये. आता तुम्ही स्वतःवरील आरोपांची राज्याबाहेर चौकशी केली जावी असा आग्रह देखील धरू शकत नाही.’’

हेही वाचा: 77 वर्षांचे 'रायडर' आजोबा; स्कुटीवरुन पालथा घातला देश