Hemant Soren : केजरीवालांना जो न्याय तो सोरेन यांना नाहीच ; न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्या

‘लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा असल्याने अंतरिम जामीन दिला जावा,’ अशी विनंती करणारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
Hemant Soren
Hemant Sorensakal

नवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायचा असल्याने अंतरिम जामीन दिला जावा,’ अशी विनंती करणारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. रांचीतील विशेष पीएमएलए न्यायालयानेदेखील सोरेन यांची जामीन याचिका फेटाळल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ज्याप्रमाणे अंतरिम जामीन देण्यात आला आहे त्याचप्रमाणे आपल्या अशिलासही जामीन मिळावा असा युक्तिवाद सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला, मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

हेमंत सोरेन यांना गेल्या जानेवारी महिन्यात जमीन गैरव्यवहारप्रकरणी तपास संस्थांनी अटक केली होती. सोरेन यांनीही अटकेची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सोरेन यांनी अटकेच्या कारवाईला आव्हान देत झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

निवडणूक संपत आली आहे त्यामुळे आपल्या अशिलाच्या याचिकेवर लवकर निकाल दिला जावा, अशी विनंती सिब्बल यांनी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर केली. यावर पुढील सुनावणी १७ मे रोजी होईल असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Hemant Soren
Arvind Kejriwal : ‘नायब राज्यपालच त्यांना हटवू शकतात’

विशेष कोर्टाचाही दणका

हेमंत सोरेन यांनी सादर केलेली जामीन याचिका रांचीतील विशेष पीएमएलए न्यायालयानेही आज फेटाळून लावली. अन्य एका प्रकरणामध्ये विशेष न्यायालयाने राज्याचे ग्रामविकासमंत्री आलमगीर आलम यांचे माजी स्वीय सचिव संजीवकुमार लाल आणि लाल यांचे सहकारी जहाँगीर आलम यांच्या कोठडीमध्ये आणखी पाच दिवसांची वाढ केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com