JIO चे रिचार्ज 700 रुपयांनी महाग! 'या' प्लॅन्समध्ये झाली वाढ

'जिओ'चे रिचार्ज 700 रुपयांनी महागले! जाणून घ्या कोणत्या प्लॅनमध्ये किती झाली वाढ
Jeo Recharge
Jeo Rechargeesakal
Summary

आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून जिओचे रिचार्ज प्लॅन 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत.

रिलायन्स जिओने(Reliance Jio) रविवारी आपले प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Mobile Prepaid recharge plan) महाग करण्याची घोषणा केली, आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून हे प्लॅन महाग झाले आहेत. जिओचे रिचार्ज प्लॅन 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. जिओच्या वेबसाइटनुसार, कंपनीच्या 3,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्वाधिक 700 रुपयांची वाढ झाली आहे. हा प्लॅन आता 4,199 रुपयांचा झाला आहे. याआधी Airtel आणि Vodafone Idea ने देखील त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. Airtel आणि Vi चे अपडेट केलेले प्लॅन गेल्या आठवड्यात लाइव्ह झाले. आता जाणून घ्या रिलायन्स जिओचा कोणता प्लॅन किती रुपयांनी महाग झाला आहे त्याबाबत.

Jeo Recharge
Amazon अन्‌ Flipkart ला टक्कर देण्यासाठी Jio चा ऍक्‍शन प्लॅन!

जिओचे हे प्लॅन महागले

रिलायन्स जिओच्या रिलीजमध्ये जिओ फोनचा 75 रुपयांचा प्लॅन 91 रुपयांचा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच हा प्लान 16 रुपयांनी महाग झाला आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, मोफत कॉलिंग, 3 GB डेटा आणि 50 SMS ही सुविधा देण्यात आली होती. मात्र, Jio च्या वेबसाइटनुसार, 75 रुपयांचा प्लॅन महाग करण्यात आलेला नाही. परंतु, वैधता 23 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच, प्लॅनसाठी उपलब्ध डेटा देखील 2.5 GB पर्यंत म्हणजे 500 एमबी कमी करण्यात आला आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 MB डेटा मिळेल. याशिवाय 200 एमबी अधिक डेटा दिला जाईल.

Jeo Recharge
हाय रिस्क 'ओमिक्रॉन' देऊ शकतो RT-PCR टेस्टलाही चकवा!

150 रुपयांपर्यंत महाग झाले जिओचे हे प्लॅन

जिओ फोनचे इतर प्लॅनही महाग झाले आहेत. 125 रुपयांचा नवीन प्लॅन आला आहे, ज्यामध्ये 23 दिवसांची वैधता दिली जात आहे. प्लॅनसोबत 11.5 GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये मोफत कॉलसह 300 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याच वेळी, 125 रुपयांचा जुना प्लॅन आता 152 रुपयांना मिळणार आहे. हा प्लॅन 27 रुपयांनी महाग झाला आहे. तर 155 रुपयांचा जुना प्लॅन आता 186 रुपयांना मिळणार आहे. हा प्लॅन 21 रुपयांनी महाग झाला आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, मोफत कॉल्स आणि दररोज 1 GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. Jio Phone चा 185 रुपयांचा जुना प्लॅन आता 222 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच हा प्लॅन पूर्वीच्या तुलनेत 37 रुपयांनी महाग झाला आहे. जिओ फोनचा 749 रुपयांचा 11 महिन्यांचा प्लॅन आता 899 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हा प्लॅन 150 रुपयांनी महाग झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com